धुळे | Dhule: घरातील वादातून घरात कोणी नसताना ९ महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला स्वतः जन्मदात्या आईनेच फाशी देऊन स्वतः आईने देखील गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धुळे तालुक्यातील वणी बुद्रुक या गावात ही घटना घडली यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
धुळे तालुक्यातील वनी बु. या गावामध्ये सोनल सुधाकर माळी (वय 23) व हर्षल सुधाकर माळी (वय ९ महिने) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. घरगुती वादातून या आईने आपल्या चिमुकल्या बाळाला संपवून (Crime) स्वतः ने देखील आपले जीवन संपविले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Mother hangs 9-month-old baby and Commits Suicide