संगमनेर: देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात, महिला ठार
Ahmednagar | Sangamner | संगमनेर: श्रीक्षेत्र जेजुरी येथे देव दर्शनासाठी जात असताना छोटा हत्ती टेम्पोला अपघात (Accident) झाल्याची घटना सोमवारी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील बोटा गावांतर्गतच्या माळवाडी शिवारात हा अपघात घडला असून एक महिला ठार झाली असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैभव योगेश गिरी चालक वय २५ वर्ष, आकाश दत्ता खोडे वय २१, पूजा दत्तात्रय खोडे, प्रिया शरद आंबेकर, चेतन गणेश शिंदे, ताराबाई दत्तात्रय खोडे, जनाबाई कुंडलिक खोडे, हे सर जण नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथील राहणार आहेत. सदर भाविक नाशिक येथून देव दर्शनासाठी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जात होते. दरम्यान आज सोमवारी पहाटे बोटा शिवारातील माळवाडी शिवारात छोटा हत्ती टेम्पोचा अपघात झाला. अपघात झाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना टेम्पोतून बाहेर काढले.
Web Title: Sangamner Woman killed in tempo accident