Home Uncategorized अहमदनगर: मोसंबीच्या बागेत गांजाची झाडे, तब्बल ११३ किलो गांजा जप्त

अहमदनगर: मोसंबीच्या बागेत गांजाची झाडे, तब्बल ११३ किलो गांजा जप्त

Ahmednagar News: मोसंबीच्या बागेत गांजाची झाडे लावल्याची घटना, पोलिसांचा छापा (Raid),  या बागेतून तब्बल साडेपाच लाख रुपये किमतीचा ११३ किलो गांजा ताब्यात.

police raid Ganja plants in Mosambi's garden, as many as 113 kg of ganja seized

शेवगाव | Shevgaon:  तालुक्यातील आखतवाडे शिवारातील बोर लवण वस्ती येथील मोसंबीच्या बागेत गांजाची झाडे लावल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी शेतात छापा टाकला असता या बागेतून तब्बल साडेपाच लाख रुपये किमतीचा ११३ किलो गांजा ताब्यात घेतला आहे.  ही कारवाई शनिवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास शेवगाव पोलिसांनी केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तालुक्यातील आखतवाडे शिवारात गट नंबर १५६ मध्ये गांजाची झाडे असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाची नियुक्ती करून या कारवाईबाबत तहसीलदार राहुल गुरव, वजन मापे निरीक्षक अनुप कुलकर्णी यांना कळविले, तसेच दोन पंच, छायाचित्रकारासह मोसंबीच्या शेतीमध्ये छापा टाकला. शेतीमालक अरुण बाजीराव आठरे याच्याकडे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी चौकशी केली असता त्याने गांजाची झाडे लावल्याची कबुली दिली. गांजाच्या सर्व झाडांची मोजदाद व वजन करून ती ताब्यात घेण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी परशुराम भीमराव नाकाडे यांनी फिर्याद दिली असून  याप्रकरणी अरुण आठरे यास अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: police raid Ganja plants in Mosambi’s garden, as many as 113 kg of ganja seized

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here