Home Uncategorized खळबळजनक: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची हत्या

खळबळजनक: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची हत्या

Pune Crime:  राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने सपासप वार करीत हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Murder of a great leader of NCP

पुणे: जेजुरी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेत पानसरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. शेतजमिनीच्या वादातून पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, , मेहबूब पानसरे यांची नाझरे धरण परिसरात शेती आहे. या शेतात ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत सुरु होती. मेहबूब पानसरे आणि त्यांच्याबरोबर इतर तिघेजण हे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते.

यावेळी वनेश परदेशी यांचे मेहबूब पानसरे यांच्यात शेतजमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की यावेळी वनेश परदेशी त्यांची दोन मुले, इतर पाच जणांनी मेहबूब पानसरे आणि इतर दोघांवर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार केले, यात तिघे जण जखमी झाले.

दरम्यान, मेहबुब शेख यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शरीरावर घाव जास्त असल्याने अतिरक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला. महेबुब पानसरे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे जवळचे समजले जातात. त्यांची हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: Murder of a great leader of NCP

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here