विधवा महिलेवर अत्याचार, आमिष दाखवून घेतला गैरफायदा
Beed Crime: विधवा महिलेला आयुष्यभर सांभाळण्याचे आमिष दाखवून तिच्यावर तीन वर्षे अत्याचार (Rape).
आष्टी | बीड: एका विधवा महिलेला आयुष्यभर सांभाळण्याचे आमिष दाखवून तिच्यावर तीन वर्षे अत्याचार केला. तसेच उसने घेतलेले तीन लाख रुपयेही बुडविल्याचा प्रकार आष्टी तालुक्यातील एका गावात घडला. तसेच पैसे मागण्यास गेलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एका महिलेचे पती २० वर्षापूर्वी मयत झालेले आहेत. तर मोठ्या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला आहे. याच मुलाचे सात लाख रुपये तिला मिळालेले होते. हि माहिती मिळताच आरोपीने फायदा घेत महिलेसोबत जवळीक साधली. तिला शेतात मजुरी दिली. त्यानंतर तिच्याशी अश्लील चाले करीत अत्याचार केला. तसेच तीनं लाख रुपये देखील उसने घेतले. पैसे मागण्यास गेलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: widow was Rape, lured and taken advantage of
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App