Home Accident News संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर बसच्या धडकेत पादचारी ठार

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर बसच्या धडकेत पादचारी ठार

Sangamner Accident  News: आंबी खालसा शिवारात बसच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना.

One killed in collision with bus on Nashik Pune highway Accident

संगमनेर: नाशिक- पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा शिवारात बसच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात शुक्रवार (दि. ७) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास घडला.  

रावसाहेब मारुती दुधवडे (वय ६१, रा. माळवदवाडी, मु खंदरमाळ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या बसने (एमएच १४ बीटी ४९९३) रस्ता ओलांडत असलेल्या दुधवडे यांना जोराची धडक दिली. या अपघातात दुधवडे यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसेंदिवस बसच्या अपघातात वाढ होताना दिसून येत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

Web Title: One killed in collision with bus on Nashik Pune highway Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here