Home पुणे १० वी व १२ वीच्या निकालाबाबत मोठी बातमी, या दिवशी निकाल जाहीर...

१० वी व १२ वीच्या निकालाबाबत मोठी बातमी, या दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता

SSC HSC Result 2022 results are likely to be announced on this day

पुणे | SSC HSC Result 2022: राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार आहेत. राज्यातील दहावी, बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. अशात दहावी, बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख जाहीर झाली आहे. 10 जून रोजी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल हा 20 जून रोजी लागू शकतो, अस राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. सध्या पेपरांची तपासणी सुरु आहे. ६५ टक्के उत्तरपत्रिकांचं काऊंटर स्कॅनिंगहही पूर्ण झालं आहे. नियोजनानुसार कामकाज पूर्ण झालं, तर निकाल याच दिवशी लागतील असं सांगितलं जात आहे. .

दहावी आणि बारावीच्या निकालात अवघ्या 10 दिवसांचा फरक आहे. आधी बारावीचा निकाल लागेल. त्यानंतर दहा दिवसांच्या फरकानं दहावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला होता.

विविध मागण्या अजूनही सरकार दरबारी प्रलंबित असल्याने विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीसाठी घेतलेच नाहीत. काहींना हे गठ्ठे बोर्डाकडे पुन्हा पाठवून दिले होते. यामुळे 10 , 12 वीच्या परीक्षांना निकाल लागण्यासाठी यंदा उशीर होणार की काय असा प्रश्न बोर्डासमोर निर्माण झाला होता. मात्र राज्य शिक्षण मंडाळाने नियोजित कार्यक्रम आखून उत्तरपत्रिका तपासणीचे काम विनाअडथळा सुरु असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

मुंबई विभागीय शिक्षण मंडळ अंतर्गत असलेली बारावीच्या एकूण १८ लाख ९२ हजार ९२९ उत्तरपत्रिका तपासणीसाठी आहेत. दहावीच्या एकूण ३३ लाख २० हजार २०७ उत्तरपत्रिका आहेत. तपासलेल्या उत्तरपत्रिका विभागीय मंडळाकडे जमा केल्या जात आहे. जमा होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

Web Title: SSC HSC Result 2022 results are likely to be announced on this day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here