Home अहमदनगर शाळेतून घरी जात असताना शाळकरी मुलीचा विनयभंग

शाळेतून घरी जात असताना शाळकरी मुलीचा विनयभंग

Schoolgirl molestation on her way home from school

Ahmednagar | राहुरी | Rahuri:  मी तुला पाचशे रुपये देतो, तू माझ्या बरोबर चल. असे म्हणून एका शाळकरी मुलीचा वाईट हेतूने हात पकडला. तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी एका विरोधात विनयभंगाचा (molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे दि. 27 एप्रिल रोजी ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, दि. 27 एप्रिल रोजी दुपारी एक वाजे दरम्यान ती अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात होती. दरम्यान गुंजाळे परिसरातील भाऊसाहेब नवले यांच्या वस्तीजवळ आरोपी अरूण सरोदे हा त्याच्या दुचाकीवर आला. तो त्या अल्पवयीन मुलीला  म्हणाला, मी तुला 500 रुपये देतो. तू माझ्याबरोबर चल. असे म्हणून त्याने त्या मुलीचा वाईट हेतूने हात धरला. नंतर तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या घटनेतील फिर्यादी व साक्षीदार यांनी आरोपी अरूण सरोदे याला पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी राहुरी पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीवरून आरोपी अरूण रावसाहेब सरोदे रा. गुंजाळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक करून गजाआड केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा हे करीत आहेत.

Web Title: Schoolgirl molestation on her way home from school

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here