Home महाराष्ट्र कडक लॉकडाऊन तरी लावा नाहीतर पूर्णतः निर्बंध हटवा: आरोग्यमंत्री राजेश टोपे

कडक लॉकडाऊन तरी लावा नाहीतर पूर्णतः निर्बंध हटवा: आरोग्यमंत्री राजेश टोपे

Strict lockdown or remove restrictions completely

Lockdown: तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. मात्र या निर्बंधाविरोधात नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लक्ष वेधले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे, रुग्ण संखेत घट झाली आहे. आरोग्य व्यवस्थेवरील ताणही हलका होत आहे. मात्र जनजीवन पूर्व पदावर येत असताना तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सरसकट निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागत असून हे निर्बंध हटविण्याची मागणी केली जात आहे. सर्वसामान्यांकडून होत असलेल्या मागणीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले आहे.

आरोग्यमंत्री यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परीस्थिती बाबत भाष्य करत असताना राज्यातील निर्बंधाबाबत आपली भूमिका मांडली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णतः काढून जनतेला दिला द्यावा किंवा कडक लॉकडाऊन करावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

Web Title: Strict lockdown or remove restrictions completely

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here