Home अहमदनगर Crime News: महिला ग्रामसेविकेला शिवीगाळ व मारहाण

Crime News: महिला ग्रामसेविकेला शिवीगाळ व मारहाण

Crime News Abuse and beating of female gram sevike

अहमदनगर | Crime News: थकीत पाणीपट्टी मागणी करण्यासाठी गेलेल्या महिला ग्रामसेविकेला मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.

नगर तालुक्यातील घोसपुरी गावात ही घटना घडली आहे. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिजवान वासिम शेख, जकिया अकलाक शेख दोघी रा. घोसपुरी या महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत घोसपुरी ग्रामसेविका जयश्री एकनाथ चितळे रा. भिंगार यांनी फिर्याद दाखल केली आहे.

ग्रामसेविका चितळे या ग्रामपंचायत कर्मचारीसह घोसपुरी गावात फकीर मोहमंद बाबुभाई शेख यांचेकडे थकीत पाणीपट्टी बिलाची वसूली करण्यासाठी गेल्या असताना तेथे असलेल्या रिजवान व जकिया यांच्याकडे चितळे यांनी पाणीपट्टी बिलाची मागणी केली. तसेच थकीत बिल अदा न केल्यास नळ कनेक्शन बंद केले जाईल अशी तोंडी समज दिली. तेथेच असलेला अकलाख शेख याने मोबाईलमध्ये शुटींग काढण्यास सुरुवात केली असता चितळे यांनी मोबाईल बाजूला केला तेव्हा रिजवान हिने चितळे यांच्या कानफटीत मारून हिम्मत असेल तर नळाला हात लावून दाखव असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.  त्यानंतर जकीया हिने चितळे यांच्याशी झटापट करून ‘नल को तो हात लगाके दिखा, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत चितळे व त्यांचे कर्मचारी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहे.

Web Title: Crime News Abuse and beating of female gram sevike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here