Home अहमदनगर गवत घेण्यास विरोध केल्याच्या रागातून महिलेस मारहाण व विनयभंग

गवत घेण्यास विरोध केल्याच्या रागातून महिलेस मारहाण व विनयभंग

Ahmednagar News Beating and molesting a woman out of anger

अहमदनगर | Ahmednagar News: शेतामध्ये गवत घेण्यास विरोध केल्याने रागातून दोघा जणांनी एका महिलेस मारहाण करत विनयभंग केला. त्याचबरोबर गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले असल्याची घटना नगर तालुक्यातील खातगाव टाकळीच्या शिवारात घडली.याबाबत एमआयडी सी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात चोरी, विनयभंग कल्मान्वे गुन्हा दाखल केला आहे.  

प्रकाश सुभाष पवार, किसन राजाराम पवार (दोघे रा. खातगाव टाकळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. खातगाव टाकळी शिवारातील उसाच्या शेतामध्ये गुरूवारी सकाळी फिर्यादी महिला व त्यांचा मुलगा काम करत होते. यावेळी किसन पवार यांची मुलगी निकीता पवार हिला शेतामध्ये गवत घेण्यास फिर्यादी महिला व त्यांच्या मुलाने विरोध केला.

याचाच राग किसन पवार यासआल्याने त्याने त्याचा चुलतभाऊ प्रकाश पवार याला बोलावून घेतले व फिर्यादी महिलेसह त्यांच्या मुलाला मारहाण केली. फिर्यादी महिलेशी गैरवर्तन करत मंगळसूत्र चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे हे करीत आहेत.

Web Title: Ahmednagar News Beating and molesting a woman out of anger

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here