Home Akole News अकोले तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सर्वोदय विद्यालय राजूरचे देदिप्यमान यश

अकोले तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सर्वोदय विद्यालय राजूरचे देदिप्यमान यश

Akole Taluka Volleyball Competition:  गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथील विद्यार्थ्यांनी देदिप्यमान यश संपादन.

success of Sarvodaya Vidyalaya Rajur in Akole taluk level Volleyball

अकोले: अगस्ती कॉलेजच्या प्रांगणात दि. २५ रोजी शुक्रवारी तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि अत्यंत चुरशीने संपन्न झाल्या. या स्पर्धेत गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथील विद्यार्थ्यांनी देदिप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या पाच संघांनी यश प्राप्त केले आहे. पाच  संघांची जिल्हास्तरीय निवड झाली आहे.

अकोले तालुका एजुकेशन सोसायटी चे पदाधिकारी मा.गिरजाजी बुवा जाधव, मा.सुधाकर राव देशमुख, मा.सुनिलजी दातीर, प्राचार्य डॉ भास्करराव शेळके, प्राचार्य आर. डी. पल्हाडे आदी मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व स्पर्धेचे उदघाटन केले.

स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे

1) 14 वर्ष मुले- प्रथम् -सर्वोदय राजूर

  द्वितिय-महात्मा फुले सुगांव

2) 14 वर्ष मुली प्रथम -सर्वोदय राजूर

  द्वितिय-महात्मा फुले सुगांव

3) 17 वर्ष मुले प्रथम-सर्वोदय् राजूर

 द्वितिय-एक लव्य मवेशी

4) 17 वर्ष मुली प्रथम -सर्वोदय राजूर

  द्वितिय-महात्मा फुले सुगांव

5) 19 वर्ष मुले प्रथम -एकलव्य मवेशी

  द्वितीय -सर्वोदय राजूर

6) 19 वर्ष मुली प्रथम – सर्वोदय राजूर 

    द्वितीय अगस्ती कॉलेज, अकोले 

या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष मनोहर देशमुख,  सचिव टी. एन. कानवडे,  संचालक मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन व व्यवस्थापक प्रकाश महाले सर्व संचालक मंडळ, तसेच विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य बी.एन.ताजणे, पर्यवेक्षक एम.बी. मोखरे यांनी अभिनंदन केले.

Web Title: success of Sarvodaya Vidyalaya Rajur in Akole taluk level Volleyball

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here