Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: ट्रॅक्टरच्या धडकेत विवाहित तरुण ठार

अहमदनगर ब्रेकिंग: ट्रॅक्टरच्या धडकेत विवाहित तरुण ठार

Ahmednagar Accident:  ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून तरुणाचा मृत्यू, ट्रॅक्टर चालक पसार, या अपघाताच्या घटनेनंतर तीव्र संताप.

Married youth killed in tractor collision Accident 

श्रीरामपूर:  तालुक्यातील दत्तनगर येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून दत्तनगर आंबेडकर वसाहत येथील विवाहित तरुणाचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. अनिल बन्सी कोळगे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे असून स्थानिक नागरिकांनी याच रस्त्यावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत घटनास्थळी रास्ता रोको करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत अनिल कोळगे आपल्या जोडीदारासह सकाळी रस्त्याच्या कडेला उभा होता. श्रीरामपूरहून बाभळेश्वरच्या दिशेने सोयाबीन वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर भरधाव वेगात जात असतांना रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या अनिल कोळगेला ट्रॅक्टर ट्रॉलीचा जोरदार फटका बसला व काही क्षणातच जमिनीवर कोसळला.

स्थानिक नागरिकांनी लगेचच अनिलला श्रीरामपूर येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अनिलला मृत घोषित केले. ट्रॅक्टर चालक घटना घडताच ट्रॅक्टर सोडून पळून गेला. घडलेल्या घटनेने स्थानिक ग्रामस्थांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली व याठिकाणी तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको करून आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे निषेध करण्यात आला.

Web Title: Married youth killed in tractor collision Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here