Home राहाता अहमदनगर:  अचानक बसला भीषण आग अन….

अहमदनगर:  अचानक बसला भीषण आग अन….

Breaking News | Ahmednagar: अचानक भीषण आग लागली. बस जळून खाक झाली.

Suddenly there was a terrible fire

पिंपरी निर्मळ: राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील बंद असलेल्या टोलनाक्यालगतच्या हॉटेल साई आदर्शच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेली खासगी ट्रॅव्हल बसला गुरुवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. बस जळून खाक झाली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पिंपरी निर्मळ शिवारातील टोलनाक्याजवळ असलेल्या हॉटेल साई आदर्शच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एनएल ०१ बी २०९३ या नंबरच्या लक्झरी बसला अचानक भिषण आग लागली. यात बस जळून खाक झाली. प्रवरा कारखाना, राहाता नगरपालिका व शिर्डी नगरपालिका यांच्या अग्निशामक बंबांनी ही आग आटोक्यात आणली. आग विझविण्यासाठी चार बंबाना तासभर परिश्रम घ्यावे लागले. यातील सर्व प्रवासी जेवणासाठी हॉटेलवर गेले असल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र काहींचे सामान यात जळून गेले आहे. प्रचंड उष्णता असल्याने व वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने प्रथमदर्शनी ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस पुण्याहून राजस्थानला जात होती. लग्नाची तिथी दाट असल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. आग लागल्याने नगर मनमाड रोडवरील प्रवासी मोठ्या संख्येने थांबून होते. लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या सहकाऱ्यांमार्फत घटनेवर नियंत्रण मिळवले. आग वेळीच आटोक्यात आल्याने प्रवाशांसह प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास टाकला.

Web Title: Suddenly there was a terrible fire

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here