Home अहमदनगर ब्रेकिंग: विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

ब्रेकिंग: विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

Suicide finding the body of a married woman in a well

राहुरी | Suicide: राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका विवाहित तरुणीचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना १५ डिसेंबर रोजी उघडकीस आली.

छाया शिवाजी भुसारे असे या मयत विवाहितचे नाव आहे. या तरुणीच्या माहेरच्या लोकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने सासरच्या तीन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मयत छाया भुसारे यांचा अनेक दिवसांपासून पैशाची मागणी करत छळ करीत होते. माहेरहून पैसे आणावेत म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला आहे. या त्रासाबाबत तिने माहेरच्यांना सांगितले होते.

आज तिचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने तिचा घातपात झाल्याचा संशय माहेरच्या लोकांनी व्यक्त केला आहे.

राहुरी पोलिसांनी पती शिवाजी आसाराम भुसारे, सासरा आसाराम भुसारे, सासू यमुनाबाई भुसारे या तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहे.   

Web Title: Suicide finding the body of a married woman in a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here