Accident: संगमनेर तालुक्यात ऊस वाहतूक करणारा ट्रक उलटला
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील कासारे गावाअंतर्गत जांभूळवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारा करणारा ट्रक उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.
प्रवरा नगर येथील विखे पाटील सहकारी साखर कारखानासाठी सायखेडा येथून उस घेऊन लोणीच्या दिशेने निघालेला मालवाहू ट्रक क्रमांक एम.एच. ०४ ए.सी. २४१३ हा जांभूळवाडी शिवारात उलटला. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने कासारे मार्गे असणार्या नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावर ही घटना घडली आहे. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात चालक सोमनाथ बबन ताजणे हे किरकोळ जखमी झाले.यावेळी रस्त्याच्या कडेला उसाचा खच पडला होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Web Title: truck transporting sugarcane overturned in Sangamner taluka Accident