Home महाराष्ट्र महाराष्ट्रात आज चार ओमिक्रॉनचे रुग्ण, एकूण ३२

महाराष्ट्रात आज चार ओमिक्रॉनचे रुग्ण, एकूण ३२

Corona News Update Omicron 32 in maharashtra

मुंबई | Corona News Update Omicron 32: राज्यात ओमिक्रॉन व्हेरीयंट चांगलाच धुमाकूळ घालत आहे. राज्यात आज दि. १५ रोजी चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील या व्हेरीयंटचे ३२ रुग्ण झाले आहेत. आजचे चारही रुग्ण परदेशातून आलेले आहे.

मुंबई एक, उस्मानाबाद दोन तर बुलढाणा जिल्ह्यात एक रुग्ण आढळून आला आहे. मुंबई येथील आयर्लंड, बुलढाणा येथील दुबई, उस्मानाबाद येथील दोन शारजा येथून आलेले आहेत. या सर्वाना अयासोलेट करण्यात आलेले असून उपचार घेत आहेत.   

राज्यातील एकूण ३२ रुग्ण:

मुंबई: १३

पिंपरी चिंचवड: १०

पुणे मनपा: २

उस्मानाबाद: २

कल्याण डोंबिवली: १

नागपूर:१

लातूर: १

वसई विरार: १

बुलढाणा: १

असे राज्यात एकूण ३२ ओमिक्रोन बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Corona News Update Omicron 32 in maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here