Home महाराष्ट्र राज्यात आणखी एका जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, एक रुग्ण पॉझिटीव्ह

राज्यात आणखी एका जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, एक रुग्ण पॉझिटीव्ह

Corona News Update Omicron in Buldhana

बुलडाणा | Corona News Update Omicron: जगात धुमाकूळ घालत असणारा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आता देशात तसेच राज्यातही आपले पाय रोवले आहे. आता बुलडाण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे.

बुलडाणा तालुक्यातील एक रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटीव्ह असल्याचं निदान झाले आहे. बुलडाण्यात आढळलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णानंतर आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 29 वर पोहोचली आहे. देशात सध्या ओमिक्रॉनचे 58 रुग्ण आढळून आले आहेत.

विदेशातून बुलडाण्यात आलेल्या या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 8 डिसेंबरला या रुग्णाचे नमुने जिनोमसाठी पाठविण्यात आले होते. सध्या या रुग्णावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून या रुग्णाला कुठलीही गंभीर लक्षणे नसल्याचे समजते.

Web Title: Corona News Update Omicron in Buldhana

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here