अकोले: विवाहितेची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा
Breaking News | Akole: विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
अकोले : तालुक्यातील चिंचावणे येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध राजूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विवाहितेच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली आहे. जया किसन डगळे असे मृत विवाहितेचे नाव आहे.
पती किसन पोपट डगळे, दीर पांडुरंग पोपट डगळे, सासू यमुना पोपट डगळे (सर्व रा. चिंचवणे, ता. अकोले) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.
विवाहितेचे वडील मधुकर भांगरे यांनी फिर्यादीत म्हटले, जया हिचा विवाह २०२०मध्ये किसन डगळे याच्याशी झाला होता. विवाह झाल्यापासून पती किसन डगळे, सासू यमुना व दीर पांडुरंग तिला त्रास देत होते. परंतु, तिच्या संसाराचा विचार करून आम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली नाही. तिला वेळेवर जेवण न देणे, शेजारी कोणाशी बोलू न देणे, आम्हाला व आमचे नातेवाईकांना तिला भेटण्यासाठी त्यांच्या घरी येऊ न देणे व तिला माहेरी येऊ न देणे अशा प्रकारे शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. दि. ५ जानेवारीला फोन आला की जया कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली आहे. त्यानंतर तिचा आम्ही शोध घेतला. त्यानंतर जाऊबाईकडून समजले की घरात सासू व तिचे भांडण झाल्याने ती घरातून निघून गेली. दि. ७ जा- नेवारीला किसन डगळे याचा फोन आला की जया आमच्या घराशेजारील विहिरीत पडली आहे. तिचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचे समजले. याबाबत मुलगी जया हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Suicide of a married woman Crime against three including husband
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News