Home अहमदनगर अहमदनगर: पतसंस्थेत अपहार, आजी-माजी संचालकांविरोधात गुन्हा

अहमदनगर: पतसंस्थेत अपहार, आजी-माजी संचालकांविरोधात गुन्हा

Breaking News | Ahmednagar: मुदत संपल्यानंतर ठेव रकमा परत देण्यास टाळाटाळ करुन ठेवीदारांची फसवणूक.

Embezzlement in credit institution, crime against ex-directors

श्रीरामपूर: मुदत संपल्यानंतर ठेव रकमा परत देण्यास टाळाटाळ करुन ठेवीदारांची फसवणूक केली. याप्रकरणी येथील श्रीसंत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व आजी-माजी संचालकांविरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठेवीदार सनी अंबिलवादे यांनी फिर्याद दिली. पतसंस्थेत फिर्यादी अंबिलवादे यांचे वडील किशोर अंबिलवादे यांनी काही रक्कम मुदती ठेव ठेवली होती. शेती विकलेली काही रक्कम आजारपणावर खर्च केली. राहिलेल्या रकमेची मुदत ठेव संत नरहरी महाराज पतसंस्थेत २००६ सालामध्ये ठेवली. यानंतर किशोर आंबिलवादे व पत्नी कल्पना किशोर आंबिलवादे हे दोघे मृत पावले. पतसंस्थेच्या संचालक मंडळाने त्यांच्या नावावरील मुदत ठेव पावत्या मुलांच्या नावावर केल्या. त्या पावत्यांची मुदत संपल्याने फिर्यादीने आंबिलवाने यांनी पतसंस्थेमध्ये रक्कम मागितली असता, संचालकांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. सुभाष लांडगे, पांडू नवनाथ धनवटे, सचिन विष्णू कांबळे, अब्बास लालखॉ पठाण यांचीसुद्धा २२.१०९ लाख रुपये व ठेवीदारांची फसवणूक करून रकमेचा अपहार केल्याचे आंबिलवादे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी शहर पोलिसातील फिर्यादीवरून श्रीसंत नरहरी महाराज पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सोमनाथ रघुनाथ महाले, संचालक निखिल विजय नागरे, अशिष सुरेश क्षीरसागर, उमेश गणपत मैड, प्रसाद दिलीप नागरे, अनंत विठ्ठलराव निकम, संजिव शामराव साळवे, स्नेहलता प्रकाश कुलथे, संगिता आनंद माळवे, सचिन वसंतराव अहिरराव, गणेश विठ्ठलराव भिसे व संस्थापक विजय रामभाऊ नागरे, प्रकाश बाबुराव कुलथे, अभिजीत राजन माळवे यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ४२०, ४०६ आदी कलमांन्वय्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Embezzlement in credit institution, crime against ex-directors

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here