Home अकोले मी बदला घेतला नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा बदला घेतला असेल तर...

मी बदला घेतला नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा बदला घेतला असेल तर मला माहित नाही- सुजय विखे पाटील

Sangamner Assembly Election 2024: बाळासाहेब थोरात यांच्या ४० वर्ष च्या दहशतीला संगमनेरची जनता अक्षरशः वैतागली.

Sujay Vikhe Assembly Election If I did not take revenge, his workers took revenge on him

संगमनेर: संगमनेर तालुक्यात अमोल खताळ पाटील यांनी विजय मिळविला आहे. संगमनेरमध्ये माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासमवेत भव्य अशी जल्लोष यात्रा निघाली होती. यावेळी सुजय विखे पाटील म्हणाले की संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या ४० वर्ष च्या दहशतीला संगमनेरची जनता अक्षरशः वैतागली होती. त्यामुळे येथील स्वाभिमानी जनतेने बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून त्यांच्या दहशतीला सडेतोड असे उत्तर दिले आहे तसेच हा विजय लाडक्या बहिणी, सर्वसामान्य शेतकरी युवक या सर्वांचा आहे. अमोल खताळ यांनी दिलेली सर्व आश्वासन पुढील पाच वर्षात पूर्ण करणार आहेत. आश्वासन पूर्ण न झाल्यास पुढील निवडणुकीला समोर येणार नाही. मी कधीही कोणाचा बदला घेत नाही परंतु संगमनेरच्या कार्यकर्त्यांनी बदला घेतला असेल तर मला माहित नाही. त्यांनी एक दिवस आधीच भावी मुख्यमंत्री असे बोर्ड लावले होते परंतु अति घाई संकटात नेई असे कदाचित त्यांना माहिती नसेल.

दरम्यान आज झालेला विजय सर्वसामान्य शिवसैनिकांचा विजय आहे असे सुजय विखे पाटील यांनी म्हंटले आहे. लोकांनी दहशितीला मुक्त केले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. अमोल खताळ म्हणजेच सुजय विखे आहेत असे म्हंटले आहे. प्रत्येक मुलगा आमदार म्हणून वावरणार आहे. जनतेचे आभार त्यांनी केले आहे. 

Web Title: Sujay Vikhe Assembly Election If I did not take revenge, his workers took revenge on him

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here