Home महाराष्ट्र दुध तापल, कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला, बैलांना दुधाची अंघोळ

दुध तापल, कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला, बैलांना दुधाची अंघोळ

swabhimani shetkari sanghatna milk andolan

सांगली: दुध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुध बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे. या आंदोलनाला आज सुरुवात झाली आहे.

आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे बंगळूरू महामार्गावरील येल्लूर फाट्याजवळ गोकुळ संघाचा टँकर फोडला. २५ हजार लिटरचा हा टँकर मुंबईला जात होता. सांगलीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातही टँकर फोडाफोडी सुरु केली आहे. बिद्री या ठिकाणी गोकुळचा टँकर फोडला आहे. नांदणी येथे भैरवनाथाला दुधाचा अभिषेक घालून स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली.

दुध दरवाढीसाठी राहुरीत आंदोलन सरकार रुपी प्रतीकात्मक दगडाला दुधाने अभिषेक तर दुध गोरगरिबांना वाटण्यात आले.

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील गोविंद वाडी या भागात मुख्यमंत्री साहेबांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्यात आले.

धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर दुध घेऊन जाणाऱ्या टँकरच्या टायरमधील हवा सोडण्यात आली.

मनमाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुध रस्त्यावर न ओतता गोर गरिबांना वाटून देण्यात आले. बुलढाणा संग्रामपूर तालुक्यात स्वभिमानीच्या वतीने बैलांना दुधाची अंघोळ घालून आंदोलन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रात दुध आंदोलनाची तीव्रता अधिक पहायला मिळत आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: swabhimani shetkari sanghatna milk andolan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here