संगमनेर शहरातील एका करोनाबाधिताचा मृत्यू
संगमनेर(Sangamner): शहर व ग्रामीण भागात सोमवारी ३० जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. संगमनेर तालुक्यात करोनाबाधितांची संख्या ३८९ झाली आहे.
संगमनेर शहरात विद्यानगर येथील एका ४८ वर्षीय व्यक्तीचा नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील करोनाबाधित मृत्यूची संख्या १७ झाली आहे. संगमनेर शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने नागरिकांमध्ये चिंतचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी कसारा दुमाला येथील एक व शिबालापूर येथील एक असे दोन बळी गेले होते. त्यानंतर आज शहरातील विद्यानगर येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sangamner corona patient Death