Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज १०० रुग्ण करोनामुक्त

अहमदनगर जिल्ह्यात आज १०० रुग्ण करोनामुक्त

Ahmednagar Today 100 corona free

अहमदनगर(Ahmednagar): आज जिल्ह्यात १०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते करोनातून बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात आता करोनामुक्त झालेल्यांची संख्या १२३३ इतकी झाली आहे.

त्यांनी व्यवस्थितपणे उपचार घेतल्याने करोनावर मात केली आहे. त्यांचा दोनही चाचणी निगेटिव्ह आल्याने तसेच त्यांना कोणतेही लक्षणे नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

या १०० बरे झालेल्यांमध्ये श्रीगोंदा २, संगमनेर २६, राहुरी ४, कॅन्टोन्मेंट १४, पाथर्डी १०, राहता १, पारनेर ७, नेवासा ६, नगर ग्रामीण २, नगर शहर १५, अकोले २, कर्जत २, कोपरगाव ९ या रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Ahmednagar Today 100 corona free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here