ब्युटी पार्लरच्या कोर्सच्या बहाण्याने नेले अन लॉजवर जाऊन अत्याचार
Breaking News | Vaijapur: ब्युटी पार्लरच्या कोर्सच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला पुण्याला नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
वैजापूर: ब्युटी पार्लरच्या कोर्सच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला पुण्याला नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलासह तिघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय साईनाथ राऊत, सुरेश साहेबराव राऊत (रा. जरुळ) व मैत्रिण (रा. वैजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशियीत आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी ही तालुक्यातील आघुर येथील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. दरम्यान पाच महिन्यांपूर्वी तिचे गावातीलच विजय राऊत या तरुणासोबत मैत्री जमली. त्यामुळे विजय व या मुलीचे फोनवर बोलणे सुरू झाले. या दरम्यान त्याने मुलीचे फोटो काढले. हा सर्व प्रकार मुलीच्या आई वडिलांना समजला. त्यांनी मुलीला समजावून सांगितले. यामुळे मुलीने विजयसोबत संभाषण सोडले. परंतु मुलीची इच्छा नसताना देखील विजय तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करीत होता. यानंतर मुलीच्या आई-वडील व इतर नातलगांनी विजयला समजावून सांगितले.
परंतु विजय राउत याच्या वागण्यात काही बदल झाला नव्हता. तो नेहमी पीडित मुलीच्या घराजवळ येत असे व तिच्याकडे एकटक बघत असे. या शिवाय तो तिच्या वडिलांच्या दुकानासमोर येऊन तु माझ्या सोबत पळून चल नाही तर, तु ज्या मुलासोबत लग्न करशील त्याला मी मारून टाकीन.’ अशी धमकी देत असे. दरम्यान मागील चार महिन्यांपासून पीडित मुलीने शहरातील एका शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये ब्युटी पार्लरचा कोर्स सुरू केला. मुलीकडे मोबाईल नसल्याने ती मागील महिन्याभरापासून मैत्रिणीच्या मोबाईल वरून विजय राउतशी संपर्क साधून बोलत होती. पीडित अल्पवयीन असल्याचे मैत्रिणीलाही माहित होते. तसेच पीडितेचे त्याचे प्रेमसंबंध असल्याबाबतही मैत्रिणीला माहित होते. परंतु त्यांची प्रत्यक्ष भेट होत नव्हती. म्हणून विजय व मैत्रिणीने पुणे येथे जाण्याचे नियोजन केले.
विजय व मैत्रिण यांनी मुलीला सांगितल्याप्रमाणे तिने घरी ‘पुणे येथे एका दिवसाचा ब्युटी पार्लरचा कोर्स आहे’ असे सांगितले. यानंतर तीची मैत्रिण व विजय यांनी ०३ जुलै रोजी रात्री मुलीला पुण्याला घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ते सर्वजण तिथे पोहोचले. तिथे पोहचताच एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले. दरम्यान मैत्रिणीने ‘मी जवळच उमेश पप्पा यांचे दर्शन घेवून येते’ असे सांगून तेथून ती निघून गेली, तर विजयने पीडितेला ०७ ते ०८ किलोमीटर अंतरावर असलेल्या लॉजवर घेवून गेला. तिथे त्याने मुलीच्या इच्छे विरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने मुलीचे आक्षेपार्ह फोटो देखील काढले. यानंतर त्याने मुलीला एक मोबाईल फोन देखील घेऊन दिला. ५ जुलै रोजी ते सर्वजण घरी परतले.
Web Title: taking a course at a beauty parlor, he went to a lodge and was abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study