Home क्राईम दोन हजारांची लाच घेताना तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

दोन हजारांची लाच घेताना तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

Nashik Crime: जमीन खरेदी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच (Bribe) मागितल्याप्रकरणी त्र्यंबकेश्‍वर येथील तलाठी व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक.

Talathi, Kotwal in ACB's net while accepting bribe

नाशिक: जमीन खरेदी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्र्यंबकेश्‍वर येथील तलाठी व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याची घटना समोर आली आहे.

तक्रारदाराने  एक जमीन खरेदी केली होती. त्यावेळी जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात संतोष शशिकांत जोशी (तलाठी) (वय-४७, रा. त्र्यंबकेश्वर) आणि रतन सोनाजी भालेराव (कोतवाल) (वय-५१) यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

त्यानंतर याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता एसीबीच्या पथकाने पडताळणी केल्यावर बुधवार (ता.५) रोजी त्र्यंबकेश्वर तलाठी कार्यालयात सापळा रचत लाचखोर जोशी यांना पंचासमक्ष दोन हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

दरम्यान, याप्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, प्रवीण महाजन, नितीन कराड, प्रमोद चव्हाणके, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Talathi, Kotwal in ACB’s net while accepting bribe

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here