Home कोल्हापूर लाच मागितल्या प्रकरणी शिक्षण सहसंचालकांसह तिघे जाळ्यात

लाच मागितल्या प्रकरणी शिक्षण सहसंचालकांसह तिघे जाळ्यात

Kolhapur: अभ्यासक्रमा मान्यतेची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी ५० हजार रुपयाची लाच (Bribe) मागितल्या प्रकरणी येथील शिक्षण सहसंचालकांसह कार्यालयातील तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई.

Three people, including the joint director of education, are in the Bribe Case

कोल्हापूर: अभ्यासक्रमा मान्यतेची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी ५० हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी येथील शिक्षण सहसंचालकांसह कार्यालयातील तिघांना आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे.

हेमंत नाना कठरे (वय ४६ वर्षे, रा.कोल्हापूर. मुळ रा. पाचवड, ता.खटाव), उच्च श्रेणी स्टोनो ग्राफर प्रवीण शिवाजी गुरव (वय ३२,रा. पिरवाडी, ता.करवीर, मूळ रा.महमंदापूर, ता.भुदरगड), कनिष्ठ लिपिक अनिल दिनकर जोंग (वय ३४ रा.राशिवडे, ता.राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या शैक्षणिक संस्थे अंतर्गत नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या दोन वेगवेगळ्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस करिता आवश्यक त्या सोयी सुविधा याची तपासणी करून प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी कटरे यांच्यासाठी गुरव याने ५० हजार रुपये लाचेची मागणी करून ती जोंग याच्याकडे देण्यास सांगितले. तडजोडी अंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम आज देत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक सरदार नाळे यांनी दिली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Web Title: Three people, including the joint director of education, are in the Bribe Case

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here