Home महाराष्ट्र Suicide: तलाठ्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेत संपविला जीवन प्रवास

Suicide: तलाठ्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेत संपविला जीवन प्रवास

Talathi Suicide on Mango tree

बुलडाणा: बुलढाणा जिल्ह्यात तलाठ्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नारायण पाटीलबा देठे असं आत्महत्या केलेल्या तलाठ्याचं नाव आहे.

स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेत आपली जीवनयात्रा त्यांनी संपविली आहे. मात्र देठे यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप समोर आले नाही.

नारायण पाटीलबा देठे हे बुलडाणा तालुक्यातील सातगाव म्हसला येथील रहिवासी होते,  तर भडगाव या ठिकाणी तलाठी पदावर कार्यरत होते. ते 55 वर्षांचे होते.

सकाळी पत्नी त्‍यांना शेतात बघण्यासाठी गेली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उतरवून पंचनामा केला. मात्र आत्महत्यामागील (Suicide) कारण अद्याप समोर आले नाही.

Web Title: Talathi Suicide on Mango tree

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here