Home अहमदनगर अहमदनगर: दोन टेम्पोंचा समोरासमोर भीषण अपघात, चालक ठार

अहमदनगर: दोन टेम्पोंचा समोरासमोर भीषण अपघात, चालक ठार

Accident Two tempos collided head-on, killing the driver

Ahmednagar | बेलवंडी: अहमदनगर-दौंड रस्त्यावर  चिखली घाटात वळणावर दोन टेंम्पो समोरा समोर आल्याने चालकांचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात (Accident) घडला. या अपघातात एक चालक ठार तर दुसर्‍या चालकासह एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी अहमदनगर-दौंड रस्त्यावर चिखली घाटात एक टेंम्पो दौंडकडे जात होता. तर दुसरा अहमदनगरकडे येत होता. एमएच १६ सीसी ०२९२ व एमएच ४१ एयु २१९१ हे दोन्ही टँम्पो मुळ वळणावर समोरासमोर आल्याने वाहनचालकांचा ताबा सुटल्याने दोन्ही टेम्पो समोरासमोर एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात (Accident) घडला.

अपघात इतका भीषण होता की एका टेम्पोतील लोखंडी पोल ड्रायव्हर केबीन तोडून चालकावर कोसळले यात अडकुन पडल्याने त्याचा जागेवर मृत्यु झाला. दोन्ही टँम्पो रस्ताच्या खाली काही अंतरावर दरीत कोसळले. एमएच १६ सीसी ०२९२ या टँम्पोचा चालक त्याच टँम्पोत असणार्‍या दुसर्‍या टँम्पोचा चालक व सहकारी गभीर जखमी झाल्याने त्याना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, सहाय्यक फौजदार सुनिल मोरे, पोलिस नंदकुमार पठारे आदींनी घटनास्थळी तातडीने पोहोचले. वाहतुक सुरळीतपणे करण्यासह मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली.

Web Title: Accident Two tempos collided head-on, killing the driver

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here