Home अहमदनगर प्रत्येक वेळी चांगलं सांगतो तरी काहींच्या भावना का दुखावतात?  इंदोरीकर महाराज

प्रत्येक वेळी चांगलं सांगतो तरी काहींच्या भावना का दुखावतात?  इंदोरीकर महाराज

some people get hurt even though they say good things every time Indorikar Maharaj

कोल्हार | Indorikar Maharaj: माझ्या वाक्यांची मोडतोड करून विडीयो क्लिप बनविल्या जातात. वादग्रस्त विधान म्हणून लोकांसमोर आणल्या जातात. मी प्रत्येक वेळी चांगलं सांगतो तरी काहींच्या भावना का दुखावतात? असा सवाल निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर (Indorikar Maharaj) यांनी केला आहे.

जगामध्ये असंख्य समस्या व प्रश्न आहेत. मात्र त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स बनवल्या जात नाहीत. मी कीर्तनातून खरं बोलतो म्हणून माझ्या दररोज व्हिडीओ क्लिप्स बनवल्या जातात. त्या क्लिप्समध्ये माझ्या वाक्यांची मोडतोड करून वादग्रस्त विधान म्हणून लोकांसमोर आणल्या जातात. मी प्रत्येक वेळी चांगलं सांगतो तरी काहींच्या भावना का दुखावतात? असा सवाल निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केला.

कोल्हार भगवतीपूर येथे श्री भगवतीदेवी मंदिराच्या प्रांगणात महाशिवरात्र महोत्सव समितीच्यावतीने बुधवारी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. यावेळी आपल्या सुश्राव्य कीर्तनात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Web Title: some people get hurt even though they say good things every time? Indorikar Maharaj

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here