Home क्राईम अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्याने उघडकीस

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्याने उघडकीस

Rape Case Abuse of a minor girl, revealed to be pregnant

Vaijapur Crime News | वैजापूर: तालुक्यातील महालगाव येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून (Rape) ती गर्भवती राहिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर बाल लैंगिक अत्याचारासह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याप्रकरणी पिडीत मुलीने फिर्याद दाखल केली आहे. पिडीताने दिलेल्या फिर्यादीवरून वीरगाव पोलिसांनी गावातीलच एकावर बाल लैंगिक अत्याचारासह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक तात्याराव सोमवते (रा.महालगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.  

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महालगाव येथील पिडीत १४ वर्षीय मुलगी बाजारतळ परिसरातील आपल्या आजीकडे राहत असते. पिडीत अल्पवयीन मुलगी मागील चार महिन्यांपूर्वी परिसरातील ओढ्याजवळील चिंचाच्या झाडाखाली सरपण वेचत होती. त्यावेळी घरासमोर राहत असलेला अभिषेक सोमवते हा त्या ठिकाणी आला. त्याने पिडीतेला पाठीमागून मिठी मारली व एका हाताने तिचे तोंड दाबून तिला फरफटत शेजारच्या उसाच्या शेतात तो घेवून गेला. त्या ठिकाणी मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केल्यास चाकूने तुझे तुकडे तुकडे करण्याची धमकी अभिषेकने देत तिच्यावर अत्याचार (sexual abusing) केला. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने घरी कोणाला ही घटना सांगितली नाही.

घरात एकटी असल्याची संधी साधत अभिषेक तेथे गेला व माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे तिला म्हणाला. त्यानंतर त्याने तिला फोन करून घरातून बाहेर बोलावून घेत परिसरातील शेतात नेवून तिच्याशी शारीरिक संबंध (sexual assault) केले. या संबंधातून पिडीता गरोदर झाली आहे. दोन दिवसापूर्वी तिचे पोट दुखू लागल्याने आजीसोबत चोरवाघलगाव येथे दवाखान्यात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे आजीला माहिती दिली.

पिडीत मुलीला घरी गेल्यावर आजी व मामा-मामीने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा सर्व प्रकार कथन केल्याने उघडकीस आला. त्यानंतर बुधवारी पिडीत मुलीसह तिच्या आजीने वीरगाव पोलिसांत धाव घेत सर्व प्रकार कथन केला. वीरगाव पोलिसांनी पिडीत मुलीचा महिला पोलीस कर्मचा-यांसमोर जबाब घेतला.

या प्रकरणी पिडीताच्या फिर्यादीवरून अभिषेक तात्याराव सोमवते (रा.महालगाव) याच्यावर वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अभिषेक सोमवतेला ताब्यात घेतले असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती करत आहे.

Web Title: Rape Case Abuse of a minor girl, revealed to be pregnant

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here