Home Accident News Accident:  टेम्पो व दुचाकीत समोरासमोर अपघात, दोघा सक्ख्या भावांचा मृत्यू

Accident:  टेम्पो व दुचाकीत समोरासमोर अपघात, दोघा सक्ख्या भावांचा मृत्यू

Ahmednagar Accident: टेम्पो व दुचाकीत समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोघा सक्ख्या भावांचा मृत्यू.

Tempo and two-wheeler face-to-face accident, death of two Sakhya brothers

अहमदनगर: टेम्पो व दुचाकीत समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोघा सक्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली. बुर्‍हाणनगर शिवारातील बाणेश्‍वर विद्यालयाजवळ हा अपघात झाला.

प्रशांत भाऊसाहेब राऊत (वय 23) आणि रवी भाऊसाहेब राऊत (वय 19, दोघे रा. बुर्‍हाणनगर ता. नगर) अशी दोघा मयत भावांची नावे आहेत

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला आहे. राऊत बंधूंचे बुर्‍हाणनगर गावात सलूनचे दुकान आहे. दुकान बंद करून ते घराकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला बाणेश्‍वर विद्यालयाजवळ अपघात झाला. अपघातानंतर या दोघांना येथील जिल्हा शासकीय रूग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र दोघेही उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राऊत बंधूचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने बुर्‍हाणनगर गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Tempo and two-wheeler face-to-face accident, death of two Sakhya brothers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here