Home अहमदनगर युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल

युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Suicide News:  मानसिक तणावातून युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या तिघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Girl commits suicide by hanging, case registered against three

अहमदनगर: मानसिक तणावातून युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  दिक्षा बाळू गुंजाळ (वय 18 रा. कामरगाव ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या तिघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिक्षाची आई सविता बाळू गुंजाळ (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे. चेरमन आकल्या भोसले, शिला चेरमन भोसले, सुरेखा हरि काळे (सर्व रा. पिंपळगाव कौंडा ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, शनिवारी सकाळी भोसले यांनी सविता गुंजाळ, दिक्षा गुंजाळ व बाळू गुंजाळ यांना शिवीगाळ केले होते. कामाचे पैसे दिल्यानंतरही भोसले याने गुंजाळ यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ केले. जर तुम्ही पैसे दिले नाही तर तुमची मुलगी हिस उचलून घेऊन जाऊ, असे म्हणत फिर्यादी व फिर्यादेचे पती बाजाराला गेले असता त्यांना भोसले यांनी शिवीगाळ, दमदाटी केली.

त्यांनी ही बाब त्यांची मुलगी दिक्षाला सांगितली. तिने टेन्शन घेऊन घरात गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल होताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Web Title: Girl commits suicide by hanging, case registered against three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here