Home अकोले अकोले: खड्डयामुळे कोल्हार घोटी रस्ता बनला मृत्युचा सापळा

अकोले: खड्डयामुळे कोल्हार घोटी रस्ता बनला मृत्युचा सापळा

खड्डयामुळे कोल्हार घोटी रस्ता बनला मृत्युचा सापळा

अकोले : अकोले तालुक्यातील प्रमुख रस्त्यांसह ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्याचे मोठया प्रमाणावर वातावात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत अकोले-संगमनेर  तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा अकोले तालुक्यातील कळस येथील छावा वॉरियर्स या युवक संघटनेसह कळस ग्रामस्थाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा दशारा सार्वजनिक बांधकाम विभागला दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

अकोले तालुक्यातील कोल्हार-घोटी राज्यमार्गावर अकोले ते चिखलीपर्यंत ठिकठिकाणी उखडला आहे. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

दुचाकी व  चारचाकी वाहन चालकाच्या दृ्ष्टिने हा रस्ता डोकेदुखी टरला आहे. रस्त्याच्या या प्रचंड दुरावस्थामुळे अनेक छोटे मोठे अपघताही नित्याचीच बाब बनली आहे. अनेक दुचाकी स्वार अपघातात जखमी झाले आहे . अनेकांना गंभीर इजा झाल्या तर काहींना जीवही गमावा लागला आहे.

रस्ता अपघातात घटना लक्षात घेता काल अकोले येथील सार्वजनिक बांधकम विभागास छावा वॉरियर्स संघटाना व कळस ग्रामस्थाच्यावतीने निवेदन देण्यात आले. या प्रश्नांची उकल न झाल्यास वेळेप्रसंगी तीव्र ओदोलन छेडण्यात येईल असा इशारा छावा वॉरियर्स संघटनेचे अध्यक्ष राहुल वाकचौरे , संदीप दराडे, गणेश तोरमल , संदिप ढगे यांच्यासह आदि कार्यकत्यांनी दिला आहे.

कोल्हार घोटी राज्य मार्गालगत अकोले-संगमनेर रस्त्यावर एका खसगी कंपनीच्या ओएफ.सी. केबल टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे रस्ता खराब होत असुन हि खोदाई नियम धाब्यावर बसवुन केली जात आहे. संबंधित काम करणारा ठेकेदार व कंपनीच्या कामगार वर्गाकडुन मनमानी सुरु आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन अकोले तालुका युवक काँग्रसचे  अध्यक्ष विकास वाकचौरे यांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना पक्षाच्यावतीने देण्यात आले आहे.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here