Home अकोले अकोले : घाटघर येथे शेतात मृतदेह‍ आढळला

अकोले : घाटघर येथे शेतात मृतदेह‍ आढळला

अकोले : घाटघर येथे शेतात मृतदेह‍ आढळला

भंडारदरा : – अकोले तालुक्यातील घाटघर या गावातील तुकाराम महादु सोडणर ही व्यक्ती त्यांच्या शेतातच मृतावस्थेत आढळली आहे. तुकाराम यांचा शेतात झालेल्या मृत्यु घातपात असल्याचा संशय मृतदेहाच्या परिस्थितीवरुन बोलले जात आहे.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

तुकाराम महादु सोडणर हे सेवानिवृत्त असुन आपल्या शेतातमध्ये काम करण्यासाठी बुधवारी सकाळी १०-११ वाजेच्या सुमारास गेले असता संध्याकाळपर्यंत घरी आले नाही. घरच्यांनी तुकाराम यांचा बरीच शोधशोध करुनही ते सापडले नाही. त्यामुळे शेतात शोध घेतला असता तुकाराम मृतावस्थेत आढळुन आले. यासंदर्भात राजुर पोलीस ठाण्यात माहिती दिली असता पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्या मार्गदर्शनाखली तात्काळ घाटघर येथ पोलिसांनी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजुर येथे हलविला. सदर गुन्हाची सध्यातरी अकस्मात मृत्यु म्हणुन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सदर मृतदेहाच्या कपाळावर काही खुणा मिळाल्या असुन शेतामधील भाताचीही काही प्रमाणात मोडतोड झाली असल्याने घातपाताची शक्यता असल्याची चर्चा काही प्रत्यक्षदर्शीकडुन ऐकावयास मिळाली.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here