Home संगमनेर Theft in संगमनेर: गुंजाळवाडी शिवारात घरे बंद करून सशस्त्र धाडसी दरोडा

Theft in संगमनेर: गुंजाळवाडी शिवारात घरे बंद करून सशस्त्र धाडसी दरोडा

Theft Armed robbery by closing houses in Sangamner

संगमनेर | Theft: संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी शिवारातील निर्मल नगर परिसरात युनिकोर्न नेस्ट या इमारतीत अज्ञात चोरट्यांनी दरोडा (Robbery) टाकल्याची घटना घडली आहे. बंद घराचा दरवाजा तोडून घरातील किमती ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर महाविद्यालयासमोरील गुंजाळवाडी शिवारातील निर्मल परिसरात असणाऱ्या युनिकोर्न नेस्ट या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर केंद्रीय पोलीस राखीव दलातील नोकरीस असलेले दत्तात्रय उगले यांच्या फ्ल्यट क्रमांक २०२ आहे. या घरातील सर्व सदस्य बाहेर गावी गेले असल्याने याच संधीचा फायदा दरोडेखोरानी घेतला. सात ते आठ दरोडेखोरानी सशस्त्र या इमारतीचा मागील भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. या दरोडेखोरानी सोसायटीतील इतरांच्या प्ल्यटला बाहेरून कड्या लावत दत्तात्रय उगले यांच्या घरातील लॉक तोडून प्रवेश करत घरातील सामानाची उचकापाचक करून किमती ऐवज चोरून नेला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये सर्व चोरटे तोंड झाकून सशस्र घेतलेले दिसत आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नेमकी ऐवज किती चोरीस गेला याबाबत पोलीस शोध घेत आहे.   

Web Title: Theft Armed robbery by closing houses in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here