Home श्रीरामपूर Accident: वीज कोसळून तीन जनावरे ठार

Accident: वीज कोसळून तीन जनावरे ठार

Accident lightning strike killed three animals

श्रीरामपूर | Accident: श्रीरामपूर व वैजापूर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या शनिदेवगाव येथील अशोक बाळा मेघळे यांच्या घराजवळील शेतात वीज पडून दोन बैल व एक गाय ठार झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मेघळे यांची घरापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर मराठी शाळेच्या पाठीमागे शेती आहे. वैजापूर तालुक्यातील देवगाव शिवारात माध्यमिक विद्यालयाशेजारी अशोक बाळा मेघळे यांची वस्ती असून हायस्कूल जवळील लिंबाखाली पावसात तीनही जनावरे पावसात आश्रयास होती. घटनास्थळाजवळच मुलगा गणेश मेघळे पत्र्याचे पढवीत आश्रयास होता.

दिवसभर कोरडे वातावरण होते. दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पाऊस सुरु झाला. पावसातच दुपारी तीन वाजता झाडावर वीज पडून दोन बैल व एक गाय हे ठार झाले. सुदैवाने या घटनेत मानवजीवित हानी झाली नाही. या घटनेने  मेघळे कुटुंबाची मोठी आर्थिक हानी झाली आहे.

Web Title: Accident lightning strike killed three animals

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here