Home अहमदनगर Theft: मध्यरात्री घरावर दरोडा, डोक्यात घातला दगड

Theft: मध्यरात्री घरावर दरोडा, डोक्यात घातला दगड

Theft Robbery at home in the middle of the night, stone thrown in the head

Ahmednagar | पारनेर | Parner Theft: भोयरे गांगर्डा येथे गुरूवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अमृत काकासाहेब पवार यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा (Robbery) घातल्याची घटना घडली आहे. या दरोड्यात बाहेर झोपलेले अमृत पवार यांच्या डोक्यात मोठा दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  भोयरे गांगर्डा येथील अमृत पवार हे नऊ वाजेच्या सुमारास  जेवण करून घराबाहेरील पडवीत झोपले असता मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अंदाजे चार ते पाच चोरट्यांनी घराला वेढा घातला. चोरट्यांनी बाहेर झोपलेले अमृत पवार यांच्या डोक्यात मोठा दगड घातला. बाहेर कशाचा आवाज आला म्हणून त्यांच्या पत्नीने घराचा दरवाजा उघडला. यादरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या पत्नीने आरडाओरडा करायला सुरुवात केली असता त्यातील दोघांनी त्यांच्या डोक्यात जोरदार काठीचा फटका मारला व एकाने हातावर काठी मारली असता त्याचा हात मोडला. चोरट्यांनी लगेच त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे दागिने ओरबाडून (Theft) घेतले. शेजारी राहणारे जागे झाल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी घराच्या पाठीमागून पळ काढला.

सुपा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Web Titile: Theft Robbery at home in the middle of the night, stone thrown in the head

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here