Home अहमदनगर राहाता तालुक्यात शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

राहाता तालुक्यात शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

youth drowned in a farm in Rahata taluka

Ahmednagar | Rahata | राहाता: आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यात जनावरांना पाणी काढत असताना पाय घसरून शेततळ्यात पडल्याने (Drowned) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे अनिल रावसाहेब लावरे (वय 32) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिलला घरचे काम उरकून पुन्हा बाहेर कामाला जायचे होते. त्याचे जोडीदार त्याला कामावर नेण्यासाठी घरी आले. अनिल कुठे गेला अशी घरी विचारणा केली असता तो पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेले असल्याची माहिती घरच्यांनी दिली. अनिलचे चुलत भाऊ संजय हरिभाऊ लावरे हे अनिलला शोधण्यासाठी शेततळ्यावर गेले. त्यांच्यासोबत बाबासाहेब लावरे, संतोष लावरे, चैतन्य कोल्हे, प्रविण लावरे, अरुण लावरे आणि किरण शेळके हे शेततळ्यावर गेले असता त्यांना तिथे मोकळा हंडा दिसून आला तसेच शेवाळावर पाय निसटण्याच्या खुणा दिसून आल्या आहेत.

संजय लावरे यांना पोहता येत असल्याने त्यांनी लगेच पाण्यात उडी मारली. त्यांना तळ्यात अनिल यांचा मृतदेह मिळून आला. त्यांनी मृतदेह पाण्याच्या बाहेर काढलायाबाबत राहता पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी मृतदेह (Dead Body) ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी साईबाबा सुपर हॉस्पिटल शिर्डी येथे नेण्यात आला.

Web Title: youth drowned in a farm in Rahata taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here