Rape Case: जवानाने तरुणीला हॉटेलवर बोलावून अत्याचार
भुसावळ | Rape Case: धरणगाव तालुक्यातील रहिवासी सैन्य दलातील जवानाने त्याच्याच गावातील २४ वर्षीय तरुणीवर प्रेमसंबंध ठेवत लग्नाचे आमिष दाखवून तिला भुसावळ येथे आणून अत्याचार (sexual abusing) केल्याची घटना २६ फेब्रुवारी २०२२ रोजी घडली.
याप्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश संजय काळे रा. धरणगाव तालुका असे संशियीताचे नाव आहे. तो सध्या जम्मू कश्मीर येथे कर्तव्यावावर आहे.
धरणगाव तालुक्यातील २४ वर्षीय तरुणी उच्च शिक्षित असून २६ फेब्रुवारी रोजी तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. परीक्षेच्या एक दिवस अगोदर २५ फेब्रुवारी रोजी संशियीत आकाशने तरुणीला भुसावळात भेटण्यास बोलावून तिला हॉटेलवर घेऊन गेला. त्यानंतर रात्री तिच्यावर अत्याचार (sexual abusing) केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: young woman to a hotel and Rape her