Home Accident News दुचाकीला अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

दुचाकीला अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Accident Woman killed in two-wheeler collision

Ahmednagar Accident | अहमदनगर: नगर पुणे महामार्गावरील नगर तालुक्यातील कामरगाव घाटवळणावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे.

आशाबाई आनंदकुमार गाढवे वय ४५ डावरे गल्ली नगर असे अपघातात (Accident) मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आशाबाई गाढवे या सुप्याकडून दुचाकीवर नगरकडे येत असताना कामरगाव घाटातील वळणावर पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अपघात घडल्यावर काही स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Accident Woman killed in two-wheeler collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here