Home क्राईम संगमनेर: वीजवाहक तारांची चोरी करताना एकाचा मृत्यू, पाच जणांवर गुन्हा

संगमनेर: वीजवाहक तारांची चोरी करताना एकाचा मृत्यू, पाच जणांवर गुन्हा

One dies while theft power lines

संगमनेर | Sangamner Theft: संगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारात रविवार दि. ६ मार्च रोजी पहाटे एक ते तीन वाजताच्या दरम्यान मोठ्या वीजवाहक तारांच्या टॉवर वरील अल्युमिनियम विजेच्या तारांची चोरी  (Theft) करत असताना तार तुटल्याने कमरेभोवती बांधलेल्या दोराचा गळफास लागून एकाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडली आहे.

योगेश रावसाहेब विघे (२० वर्ष) रा. पिलानी वस्ती चीखलठाण ता.राहुरी असे मयत झालेल्या तरुणांचे नाव आहे.

याप्रकरणी घारगाव पोलिस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल केला आहे. विशाल राजेंद्र पंडित (१८ वर्ष) आदित्य अनिल सोनवणे (२० वर्ष ) रा. शिंदोडी, संकेत सुभाष दातीर (२६ वर्ष) रा. पिंप्रीलौकी आणि सरफराज इकबाल शेख रा.रामगड ता.श्रीरामपूर व एक विधीसंघर्शित बालक हे सर्वानवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये  एक ईनोव्हा कार व टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, योगेश रावसाहेब वीघे यास विशाल आणि आदित्य हे शिंदोडी येथे घेऊन आले. या सर्वांनी पहाटे एक ते तीन वाजताच्या दरम्यान शिंदोडी शिवारातून विज वाहून नेणाऱ्या टॉवरवर योगेश यास चोरी करण्याच्या उद्देशाने बळजबरीने चढविले आणि त्यास टॉवर वरील अल्युमिनियम धातूच्या वीजवाहक तारा कापण्यास सांगितले आणि त्याचेकडून तारा कापून घेतल्या. याच दरम्यान तारा कापत असताना तार तुटते वेळी योगेश यांच्या पोटास बांधलेल्या दोरीचा गळफास बसल्याने हालचाल बंद झाली. त्यानंतर वरील पाच जणांनी ईनोव्हा कार क्रमांक एम एच २० ए जी ५२५८ मधून योगेशला औषध उपचारासाठी लोणी येथील पी.एम. टी.हॉस्पिटल मध्ये नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे रूग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

याप्रकरणी रावसाहेब सुखदेव  विघे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घारगाव पोलिसांनी चार जण  एक विधीसंघर्शित बालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून यात एक ईनोव्हा कार व टेम्पो जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: One dies while theft power lines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here