Home क्राईम सोशियल मेडीयावर मैत्री करून हॉटेलमध्ये अत्याचार, व्हिडिओ बनवून मग  

सोशियल मेडीयावर मैत्री करून हॉटेलमध्ये अत्याचार, व्हिडिओ बनवून मग  

Sexually abusing in a hotel by befriending on social media

जळगाव | Jalgaon Crime : इन्टाग्रामवर मैत्री करून ३३ वर्षीय विवाहितेवर हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार (Sexually abusing) करत हॉटेलमध्ये केलेले व्हिडीओ दाखवून ५० हजाराची मागणी (Blackmail) केल्याची घटना घडली आहे.  याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबीयांसोबत राहत  असलेल्या ३३ वर्षीय विवाहित महिलेचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय करत संसाराला हातभार लावते. त्यांचे इन्ट्राग्रामवर त्यांचे खाते आहे. या खात्यावरून संशयित आरोपी गणेश प्रकाश चौधरी (वय ४८) याची ओळख झाली. इन्ट्राग्रामवर  मैत्री झाल्याने फेशीयल करण्याचे कारण दाखवून विवाहितेला शहरातील एका हॉटेलमध्ये गणेश चौधरी हा घेवून गेला आणि  तिच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा फिरवून आणण्याचे बहाण्याने हॉटेलमध्ये घेवून गेल्यावर पुन्हा अत्याचार (Sexual abusing) केला.

संशयित आरोपीने एवढेच न करता केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ (Porn Video) बनवत विवाहितेला ५० हजाराची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्या पतीला दाखविण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरु केले. हे प्रकरण वाढत असल्याने  तीने पतीला आपल्या विश्वासात घेत हा सर्व प्रकार सांगितला असता तिच्या पतीनेही तिला साथ दिली. विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून संशयित आरोपी गणेश चौधरी याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.

Web Title: Sexually abusing in a hotel by befriending on social media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here