केमिकल कंपनीला भीषण आग; चार पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट
खोपोली: रायगड जिल्ह्यातील खोपोलीत केमिकल कंपनीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण होती की, ४ ते ५ किलोमीटरपर्यंत धुराचे लोट पसरत होते. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीने कंपनीचे मोठे नुकसान झाले असून दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील खोपोली येथील अल्टा फार्मास्युटिकल लॅब या कंपनीत भीषण आग (Fire) लागली. हि कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी आली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. कंपनीला लागलेली आग इतकी भीषण होती की, चार ते पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट दिसत होते. त्यामुळे परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली होती. आगीत कंपनीतील संपूर्ण प्लांट जळून खाक झाला. आठ रिअॅक्टर पूर्णपणे भ खोपोली नगरपालिका, अलाना कंपनीच्या अग्निशमन यंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, धुराचे लोट हे पाच किलोमीटरपर्यंत पसरले होते. आग नियंत्रणात आली असली तरी, धोका अद्याप टळलेला नाही असे सांगण्यात येत आहे. या आगीत दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते.
Web Title: Khopoli Chemical company catches fire