Home अहमदनगर शालेय पोषण आहारातील मालाची चोरी, विद्यार्थ्यांचा घास हिसकावला

शालेय पोषण आहारातील मालाची चोरी, विद्यार्थ्यांचा घास हिसकावला

Theft of school nutrition food items

Pathardi Theft| पाथर्डी: शहरातील श्री तीलोक जैन विद्यालयातील शालेय पोषण आहारातील मालाची अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना घडली आहे. सुमारें ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी (Theft) केला आहे. याबाबत विद्यालयाचे पर्यवेक्षक विजय गजकुमार घोडके यांनी अज्ञात चोरट्याविरुध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पाचवी वी ते आठवी वी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आलेला शालेय पोषण आहार वाटप विद्यालयामार्फत करण्यात येतो. हा सर्व माल विद्यालयात ठेवण्यात येतो आणि नंतर तो विद्यार्थ्यांना नियमानुसार वितरीत केला जातो.

विद्यालयातील परिसरात तंत्र विभागाच्या शेजारील आहाराचा तांदूळ,  मुगदाळ, मटकी व इलेक्ट्रिक वजन काटे असे सामान ठेवण्यात आला होता. शुक्रवार दि. ४ मार्च ते शनिवार दि.५ मार्च च्या दरम्यान सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गोडावुनचे कुलुप तोडुन त्यातील ५,९०४ रुपये किंमतीचा शालेय पोषण आहारचा ७३८ किलो ग्रॅम तादुळ, २७,३१५ रुपये किंमतीचा शालेय पोषण आहारचा ५४६.३ किलो ग्रॅम मुगदाळ, ९,०१५ रुपये किंमतीचा शालेय पोषण आहारचा ३००.५ किलो ग्रॅम मटकी, ९,७०० रुपये किंमतीचे तीन इलेक्ट्रीक वजन काटे असा एकुण ५१,९३४ रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी अनिल भवार व केंद्रप्रमुख राजेंद्र बागडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Theft of school nutrition food items

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here