Home अहमदनगर युक्रेनमध्ये अडकलेले जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी मायभूमीत

युक्रेनमध्ये अडकलेले जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी मायभूमीत

Ahmednagar All students from the district stranded in Ukraine in Mayabhumi

Ahmednagar | अहमदनगर: एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील २५ विद्यार्थी युक्रेन देशात गेले होते. यामधील ९ विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचले आहे तर १६ विद्यार्थी रविवारी सायंकाळी उशिरा दिल्लीत पोहोचले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी मायभूमीत दाखल झाले आहे. अशी माहिती नगरमधील एजुकेशन संस्थेचे डॉ. महेंद्र झावरे यांनी दिली.

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी शासनाने सुरक्षित भारतात आणावे अशी मागणी डॉ. झावरे यांनी जिल्हा प्रशासनाला विद्यार्थ्यांची यादी सुपूर्द केली. त्यांनतर युक्रेन देशातील वेगवेगळ्या विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी जिल्ह्यात परत येऊ लागले. सुरुवातीला दोन आणि दोन दिवसांपूर्वी ७ विद्यार्थी दाखल झाले उरलेले १६ विद्यार्थी रविवारी सायंकाळी उशिरा दिल्लीत दाखल झाले. सोमवारी हे विद्यार्थी आपापल्या घरी पोहोचतील. यामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.  

Web Title: Ahmednagar All students from the district stranded in Ukraine in Mayabhumi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here