Home अकोले कळसेश्वर देवस्थान वरील वैष्णवी देवी मंदिरात चोरी, दोन तोळे सोने चांदीचा मुकुट

कळसेश्वर देवस्थान वरील वैष्णवी देवी मंदिरात चोरी, दोन तोळे सोने चांदीचा मुकुट

Akole Theft News:  मंदिरावरील वैष्णवी देवीच्या अंगावरील नेकलेस व चांदीचा मुकुट व मंदिरावरील भक्त विवेक वाकचौरे यांचा मोबाईल चोरट्याने लंपास.

Theft two tola gold and silver crown from Vaishnavi Devi temple on Kalseshwar 

कळस : अकोले तालुक्यातील कळस बु येथील कळसेश्वर मंदिरावर काल दि.११ सप्टेंबर रोजी चोरीचा प्रकार घडला. मंदिरावरील वैष्णवी देवीच्या अंगावरील नेकलेस व चांदीचा मुकुट व मंदिरावरील भक्त विवेक वाकचौरे यांचा मोबाईल चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.सदर चोरट्याची सर्व कैफियत सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाली आहे.

सविस्तर असे की सीसीटीव्ही मध्ये दिसल्याप्रमाने कळसेश्वर मंदिरावर ठिक रात्री ९.३७ वा एका अज्ञान चोरट्याने शिरकाव केला.आणि मंदिराच्या भागात दडुन बसला.त्यानंतर मंदिरावरील आरती व गजबज बंद झाल्यानंतर रात्री सव्वा आकरा वाजल्यानंतर अज्ञान इसमाने आपल्या चोरीचा कार्यक्रम सुरू केला.प्रथम मंदिराच्या चाव्या घेऊन वैष्णव देवी मंदिर उघडले त्यातील ऐवज चोरून मंदीर पुन्हा कुलुपबंद केले. त्यानंतर मंदीराच्या चाव्या जागच्या जागी नेऊन ठेवल्या.त्यानंतर ब्रम्हलीन प.पु.सुभाषपुरी महाराष्ट्र यांच्या समाधीस्थळी दानपेटी तोडण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर मंदीराच्या सभागृहात भक्त विवेक वाकचौरे व विष्णु वाकचौरे झोपलेले होते विवेक यांचा मोबाईल त्यांच्या जवळ ठेवलेला होता तोही मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला व मंदीराच्या बाजुने खाली उतरत पळ काढला.जवळपास अर्धा तास चोरीचा कार्यक्रम राबवत असताना अज्ञात इसम दिसत आहे. पण चेहर्यावर टोपी असल्याने चेहर्याचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही. चोरीनंतर गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच चोराने ज्या पध्दतीने चोरी केली त्यावर मंदीरावरील सर्व माहिती असलेला व्यक्तिनेच असा डाव टाकल्याचे दबक्या आवाजात चर्चा आहे.यावेळी चोरीची माहीती कळताच अकोलेचे पीआय मिथुन घुगे यांनी पहाटे मंदिरावर भेट देत चौकशी करण्याची मोहीम हातात घेतली आहे. तसेच दिवस भर अकोलेचे पीएसआय हांडोरे साहेब उपविभागीय पोलीस अधीक्षक टिमचे गणेश शिंदे,पोलीस अविनाश गोर्डे,पोलीस आत्माराम पवार,पोलीस सुयोग भारती हे गावातील तसेच मंदिरावरील सीसीटीव्ही तसेच चौकशी करत होते. यावेळी गावातील सर्वच जेष्ठ मंडळींने याबद्दल हुरहूर व्यक्त केली तसेच देवस्थान चे अध्यक्ष विठ्ठल वाकचौरे , सरपंच राजेंद्र गवांदे,पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, चेअरमन विनय वाकचौरे, नामदेव निसाळ, गणेश रेवगडे, भाऊसाहेब माधव वाकचौरे, विवेक वाकचौरे, विष्णु वाकचौरे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Web Title: Theft two tola gold and silver crown from Vaishnavi Devi temple on Kalseshwar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here