Home क्राईम संगमनेर: बसस्थानकासमोर पेट्रोल टाकून दुचाकी जाळली, गुन्हा दाखल

संगमनेर: बसस्थानकासमोर पेट्रोल टाकून दुचाकी जाळली, गुन्हा दाखल

Sangamner Crime:  दुचाकी भर चौकात आणून पेट्रोल टाकून जाळल्याची (Burnt) घटना.

Petrol was poured in front of the bus station and the bike was burnt

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे जुन्या भांडणाच्या रागातून समीर बाळकृष्ण होडगर यांची दुचाकी भर चौकात आणून पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली असून आश्वी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास समीर होडगर हा आश्वी बुद्रुक येथे गॅरेजसमोर उभा असताना रविंद्र उर्फ बंटी साहेबराव मदने हा त्या ठिकाणी आला व त्याने शिवीगाळ करत एक मोठा दगड उचलून समीर यांच्या पाठीत दोन ते तीन वेळा मारला. त्यामुळे समीरने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता समीरला धरुन माझ्या नादी लागला कारे, आता तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने समीरच्या डोक्यात दगड मारत दुखापत केली. यावेळी जखमी झालेला समीर हा मदने याच्या तावडीतून सुटून पळाला. यावेळी मदने याच्या मित्राने समीरची दुचाकी आश्वी बुद्रुक बस स्थानकावर ढकलत आणली. यानंतर दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे दाखल तक्रारीत म्हटल्याने आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६९/२०२२ नुसार भादंवी कलम ३०७, ३२४, ५०४, ४२७, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, हवालदार निलेश वर्पे, रवींद्र वाकचौरे, दहिनिवाल, वाघ आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी रविंद्र उर्फ बंटी साहेबराव मदने व त्याचा मित्र (दोघे रा. आधी बुद्रुक, ता. संगमनेर) या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

Web Title: Petrol was poured in front of the bus station and the bike was burnt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here