Home क्राईम संगमनेर तालुक्यात चंदन झाडांची चोरी, चार जणांवर गुन्हा

संगमनेर तालुक्यात चंदन झाडांची चोरी, चार जणांवर गुन्हा

Sangamner Theft: 40 हजार रुपयांचे चंदनाचे पाच झाडांची चार जणांनी चोरी केल्याची घटना.

Theft of sandalwood trees in Sangamner taluk, four persons crime filed

संगमनेर: तालुक्यातील कुरण येथे एका शेतकऱ्याच्या 40 हजार रुपयांचे चंदनाचे पाच झाडांची चार जणांनी चोरी केल्याची घटना शुक्रवार (दि. ९) रात्री साडे आठ ते शनिवारी (दि. १०) सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जब्बार सत्तार शेख संगमनेर तालुक्यातील कुरण या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. शेती व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास शेख हे नेहमीप्रमाणे वस्तीकडे जात असताना

बंधाऱ्याच्या वळणावर त्यांच्या शेताजवळ राहणारे जगन्नाथ नाथा माळी, मिराबाई जगन्नाथ माळी, विश्वास जगन्नाथ माळी व राजु जगन्नाथ माळी (सर्व रा. कुरण ता. संगमनेर ) हे भेटले. त्यावेळी त्यांना विचारले पोत्यामध्ये काय आणले आहे.

त्यावेळेस जगन्नाथ याने सांगितले की, आम्ही सर्वांनी चुल पेटविण्याकरिता सरपन आणले आहे. परंतु गोण्या मध्ये मोठे सरपण होते. त्यानंतर शेख वस्तीकडे निघून गेले व ते चौघे त्यांचे घराकडे निघुन गेले. शनिवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास शेख शेतात विहिरीजवळ गेले असता त्यांनी पाहिले की, गट नं. २१६ वरील बांधावर चंदनाची झाडे होती. परंतु त्यापैकी पाच झाडे ही आहेत.

खोडापासुन साधारण सात ते आठ वर्षांची उंची आठ फुट असलेली जाडी १० ते १२ इंच असलेले चंदनाची झाडे चोरीला गेले होतेत्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, रात्री साडे आठ वाजता जगन्नाथ माळी त्याची दोन मुले व बायको यांनीच ती झाडे तोडून नेली असल्याच्या संशय शेख यांना आला आहे. एकूण ४० हजार रुपये किंमतीची ही झाडे आहेत. याप्रकरणी जब्बार सत्तार  शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील चौघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश धादवड हे करत 

Web Title: Theft of sandalwood trees in Sangamner taluk, four persons crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here