Home अहमदनगर Crime: रिलेशनशीप ठेवण्यासाठी तरुणीला अश्लील मेसेज पाठवून चाकूने गळा कापण्याची धमकी

Crime: रिलेशनशीप ठेवण्यासाठी तरुणीला अश्लील मेसेज पाठवून चाकूने गळा कापण्याची धमकी

Threatening to cut the throat with a knife by sending obscene messages to the young woman

Ahmednagar Crime | अहमदनगर: एका पतसंस्थेत काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला रिलेशनशीप ठेवण्यासाठी वारंवार अश्लील मेसेज (obscene messages)पाठवून तसेच रिलेशनशीप ठेवली नाही तर चाकूने गळा कापण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर व त्याच्या साथीदारावर  भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश लक्ष्मण यादव व विकास सांगळे (दोघे रा. वाकोडी फाटा, ता.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, केडगाव उपनगरात राहणारी एक 19 वर्षीय तरुणी ही वाकोडी फाटा येथे असलेल्या एका पतसंस्थेत नोकरीला आहे. गेल्या काही दिवसांपासून आकाश यादव हा त्या तरुणीला फोनवर अश्लील मेसेज करीत माझ्याशी रिलेशनशीपमध्ये राहा असे म्हणत त्रास देत होता.त्याकडे या तरुणीने दुर्लक्ष केल्याने तो तिला वारंवार मेसेज करू लागला तसेच फोनही करायचा. दोन दिवसांपूर्वी तर त्याने त्याच्याशी रिलेशनशीप नाही ठेवली तर चाकूने गळा कापण्याची धमकी दिली.

तसेच त्याचा मित्र विकास सांगळे हा त्या तरुणीला फोन करून आकाश याचे फोन उचल असे सांगत असे. या त्रासाला कंटाळून तरुणीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा आरोपींच्याविरोधात भा. दं. वि. कलम 354 (ड),506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.

Web Title: Threatening to cut the throat with a knife by sending obscene messages to the young woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here